• मेष:-
    तुमची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. गुह्यभागाचे त्रास जाणवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. भावनिक विचार मांडाल. व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.
  • वृषभ:-
    मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. योग्य वेळेची वाट पाहावी. समय सुचकता बाळगावी. घाईने निर्णय घेतले जातील.
  • मिथुन:-
    मनातील इच्छेला महत्व द्याल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. शेअर्सच्या कामात यश येईल. कामाची गती वाढवावी. निराशा मनातून दूर सारावी.
  • कर्क:-
    एककल्ली विचार करू नका. मुलांची स्वच्छंदी वृत्ती समजून घ्यावी. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढेल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. कामात ऊर्जा जाणवेल.
  • सिंह:-
    तुमच्या नावलौकिकात भर पडेल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. कौटुंबिक शांतता जपावी. वाहनांच्या वेगावर मर्यादा घालावी. जमीन-जुमल्याच्या कामात यश येईल.
  • कन्या:-
    परिस्थितीतून मार्ग काढाल. संघर्षाला बळी पडू नका. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद संभवतात. हातापायाच्या दूखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
  • तूळ:-
    भागीदारीत खुश असाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. श्रमाला घाबरू नका. उतावीळपणा उपयोगाचा नाही. चुकून भडक बोलले जाऊ शकते.
  • वृश्चिक:-
    कामातील जोम वाढेल. ध्येय साध्य करण्याकडे लक्ष द्याल. दुसऱ्यांवर हुकूमत गाजवाल. रागावर नियंत्रण ठेवावे. उष्णतेचे त्रास जाणवेल.
  • धनु:-
    सामाजिक वादात लक्ष घालू नका. कामे वेळेत पूर्ण करा. अडचणींवर मात करावी. वक्तृत्वाची संधी मिळेल. आशादायी दृष्टिकोन ठेवावा.
  • मकर:-
    दिवस आनंदात घालवाल. हातातील कामात यश येईल. सुखासीन वृत्ती वाढेल. चैनीकडे अधिक लक्ष लागेल. झोपेची तक्रार राहील.
  • कुंभ:-
    सामाजिक कामात जपून राहावे. आपली प्रतिष्ठा जपावी. कामाच्या ठिकाणी वादाचे मुद्दे आणू नयेत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. अनपेक्षित अडचणीतून मार्ग काढावा.
  • मीन:-
    प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठ आपल्यावर नाराज होऊ शकतात. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला स्त्री सहवास लाभेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर