मेष:- वाहन चालवितांना काळजी घ्यावी. मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. वृषभ:- इतरांच्या मदतीशिवाय कामे कराल. सारासार बुद्धीचा वापर करावा. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्या. न्यायी वृत्ती दर्शवाल. मिथुन:- गायन कलेत प्रगती कराल. उदारपणा दाखवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. आवडी-निवडीवर अधिक भर द्याल. घशाचे विकार त्रास देवू शकतात. कर्क:- मानीपणा दाखवाल. तुम्हाला सामाजिक दर्जा मिळेल. आपले मत उत्तमपणे मांडाल. हजरजबाबीपणा दाखवाल. कामाचा ताण जाणवेल. सिंह:- प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. शाब्दिक चकमक टाळावी. विचारांना योग्य चालना द्यावी. कन्या:- सामाजिक वादात सहभाग घेवू नये. लहान मुलांमध्ये रमून जाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात सतर्कता ठेवावी. तुळ:- मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. सतत खटपट करत रहाल. मैत्रीत सलोखा ठेवावा. व्यावसायिक फायद्याचा विचार कराल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधावा. वृश्चिक:- व्यावसायीक बदलांना सामोरे जाल. नोकरदारांना बदलीचे योग येतील. हातातील कामास गती प्राप्त होईल. धोरणीपणाने वागाल. धैर्याने कामे कराल. धनु:- वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तांत्रिक ज्ञान करून घ्यावे. मैदानी खेळत प्रगती होईल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. चिकाटी सोडू नका. मकर:- स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य द्वीगुणीत होईल. जोडीदाराचे कौतुक कराल. खर्चाचे योग्य नियोजन करावे. संयम बाळगावा. कुंभ:- काही बाबींकडे दुर्लक्ष करावे. समजूतदारपणा दाखवावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. इतरांचा विश्वास संपादन करावा. कफ विकार जाणवू शकतात. मीन:- भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. तिखट पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवून वागाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. उष्णतेचे विकार जाणवू शकतात. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर