• मेष:-
    स्वभावात काहीसा मानीपणा येईल. महत्वकांक्षा वाढीस लागेल. दर्जा टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. हातातील अधिकारात वाढ होईल. प्रयत्नात कमी पडू नका.
  • वृषभ:-
    काही गोष्टी वेळेअभावी मागे राहतील. अवास्तव अपेक्षा बाळगू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. कष्ट घेण्यात कमी पडू नका. इच्छा पूर्ण होण्यास थोडा वेळ द्यावा.
  • मिथुन:-
    जोडीदाराचा मानीपणा लक्षात येईल. उच्च राहणीची आवड दर्शवाल. ठाम निर्णय घेण्यात कमी पडू नका. पत्नीची प्राप्ती वाढेल. आधुनिक विचारांची कास धरावी.
  • कर्क:-
    गैरसमजुतीतून भांडणे वाढू शकतात. परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास जाणवतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मामाची मदत घेता येईल.
  • सिंह:-
    वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. आर्थिक गोष्टींवरून वाद वाढू शकतात. आध्यात्मिक प्रगती करता येईल. तर्कनिष्ठ बुद्धिमत्ता वापराल. स्त्री दाक्षिण्य दाखवाल.
  • कन्या:-
    उत्तम वाहन सौख्य लाभेल. परिस्थितीशी जुळवून घ्याल. सुखशांती व उत्तम गृहसौख्य लाभेल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. बौद्धिक हातवादीपणा दाखवू नका.
  • तूळ:-
    उतावीळपणा करू नका. खर्च करतांना मागचा-पुढचा विचार करावा. डोळ्यांचे त्रास जाणवतील. श्रम करण्यात कमी पडू नका. नको तिथे उदारपणा दाखवू नये.
  • वृश्चिक:-
    मेहनतीत कमी पडू नका. तुमचा रुबाब दिसून येईल. उतावीळपणा करू नका. ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. आपलेच म्हणणे खरे कराल.
  • धनु:-
    आवडीचे पदार्थ खायला मिळतील. उत्कृष्ट वक्तृत्व दाखवाल. लाघवी व गोड बोलाल. बौद्धिक हातवादीपणे वागू नका. गायन कला जोपासता येईल.
  • मकर:-
    सतत खटपट करत राहाल. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे. प्रत्येक गोष्टींचा आनंद घ्याल. चांगली मैत्री लाभेल.
  • कुंभ:-
    मानसिक चिंता दूर सारावी. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. मनाचे स्थान मिळेल. चांगला आर्थिक लाभ होईल.
  • मीन:-
    मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आवडत्या वस्तू खरेदी करता येतील. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने कृती करावी. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडाल. हातात उच्च अधिकार येतील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर