मेष

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. आजचे ग्रहमान सर्व प्रकारच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. गुरूचरित्राचा १४ वा अध्याय वाचावा.
आजचा रंग – निळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखाल. वादविवाद टाळावेत. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा शुभ रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. व्यवसाय नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावे. ओम गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशी निगडित नोकरी, व्यवसायामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतर वेळ आनंदी जाईल. ओम श्री आदित्याय गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – निळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करणे.
आजचा रंग – तपकिरी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. कौटुंबिक सुख जाणवेल, नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसायाशी निगडित चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. ओम द्रां दत्तात्रयाय नमः जप करणे.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष्य करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. ओम द्रां दत्तात्रयाय नमः जप करावा.
आजचा रंग – क्रीम

धनु

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. मुलांशी निगडित किंवा धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ओम आदि गुरवाय नमः जप करावा.
आजचा रंग- आकाशी

मकर

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होईल शकेल. कुटुंबात सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. ओम मिऋतये नमः हा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. भावंडाशी वादविवाद टाळावेत. जुन्या गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. गुरुमंत्राचा जप सुरू ठेवावा.
आजचा रंग – तपकिरी

मीन

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. आज विनायक चतुर्थी आहे. स्थावर मालमत्तेशी जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश लाभेल. कलाकार विचारवंत साहित्यिकांना उत्तम दिवस. धनस्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग होतील. निशिगंधाचे फूल दत्त महाराजांना अर्पण करावे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu