मेष

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. ओम द्रां दत्तात्राय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करणे.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. भावंडांच्या भेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करणे.
आजचा रंग – पांढरा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. गणपती पूजन आणि अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. दगदगीचे दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. ओम श्री दत्तात्रयाय नमः जप करावा.
आजचा रंग – नारंगी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. वादविवाद टाळावेत. गणपती पूजन आणि अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. उत्तम व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. दत्त महाराजांच्या मंदिरा पांढरे पदार्थ अर्पण करणे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. गणपती पूजन आणि अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पोपटी

धनु

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कुटुंबासमवेत वेळ आनंदात घालवू शकाल. संततीसौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती उत्तम राहील. ओम श्री दत्तात्रयाय नमः जप करावा.
आजचा रंग – नारंगी

मकर

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न मार्गील लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावीत. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा २१ वेळा जप करणे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण मेष राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. ओम शांभवे नमः जप करणे.
आजचा रंग – नारंगी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu