05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  पत्नीची प्रगती होईल. तुमचा संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. उगाचच काळजी करत बसू नका. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे.
 • वृषभ:-
  आरोग्यात सुधारणा होईल. ऐनवेळी येणाऱ्या गोष्टी संयमाने हाताळाव्यात. मुलांच्या वागण्याचा शांतपणे विचार करावा. लहानांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक शांतता लाभेल.
 • मिथुन:-
  कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. लहान गोष्टीतही समाधान मानावे. घरासंबंधी प्रश्न उभे राहतील. हातातील कामात यश येईल. दुचाकी वाहन चालवितांना सतर्क राहावे.
 • कर्क:-
  तुमची हिम्मत वाढीस लागेल. प्रवास घडतील. महत्त्वकांक्षा वाढीस लावावी लागेल. कामातून समाधान शोधाल. मन:स्थिती जपण्याचा प्रयत्न करावा.
 • सिंह:-
  स्वभावातील उधळेपणा बाजूला सारावा लागेल. खर्च करताना मागचापुढचा विचार करावा. भांडणात अडकू नका. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. कोणाचाही द्वेष करू नका.
 • कन्या:-
  श्रम व दगदग वाढू शकते. कामात उत्साह वाढेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेवू नका. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. प्रतिकुलतेतून मार्ग काढावा.
 • तूळ:-
  कोर्टाच्या कामात अडकून पडाल. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. खर्च वाढू शकतो. लोकनिंदेला बळी पडू नका. गैरसमज बाजूला सारून विचार करावा.
 • वृश्चिक:-
  उंची वस्तू खरेदी कराल. जमिनीच्या कामातून आर्थिक मान सुधारेल. मित्रांशी वितुष्ट येवू शकते. मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. श्रमाचे चीज होईल.
 • धनु:-
  जुन्या गोष्टी समोर येवू शकतात. कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित बदल होवू शकतात. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सावध राहावे. रजेवर जावे लागू शकते. काहीतरी नवीन विचार करावा.
 • मकर:-
  मानापमानाचे प्रसंग दुर्लक्षित करावेत. प्रवासात सावधानता बाळगावी. वरिष्ठांना खुश करावे. हातातील कामात अधिक चिकाटी ठेवावी. नातेवाईकांना मदत कराल.
 • कुंभ:-
  साथीच्या विकारांचा त्रास संभवतो. शारीरिक कष्ट वाढू शकतात. हातातील कामाचा वेग मंदावू शकतो. निराश होण्याचे कारण नाही. मदतीचे समाधान लाभेल.
 • मीन:-
  वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. मानसिक संतुलन राखावे. भागीदाराशी सलोखा वाढवावा. अचानक धनलाभ संभवतो.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 29 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २७ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X