मेष:-

आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल.

वृषभ:-

तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी.

मिथुन:-

मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे.

कर्क:-

कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका.

सिंह:-

स्वमुल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.

कन्या:-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला.

तूळ:-

योग्य पथ्ये पाळावीत. पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्‍यांच्या विरोधात कामे करू नका.

वृश्चिक:-

कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.

धनू:-

आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत. नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो.

मकर:-

कामाच्या ठिकाणी आळस करू नका.  इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. एकमेकांचे सुख-दू:ख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तिला आकर्षित करू शकाल.

कुंभ:-

बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मीन:-

स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर