12th June Panchang & Marathi Rashi Bhavishya: १२ जूनला ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असणार आहे. बुधवारच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत षष्ठी तिथी कायम असेल. १२ जूनला संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत हर्षण योग सुद्धा असणार आहे. तसेच बुधवारी रात्री उशिरापर्यंत म्हणजे साधारण २ वाजून १३ मिनिटांपर्यंत मघा नक्षत्र जागृत असेल. आजच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी शुक्र सुद्धा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुनसह अन्य १२ राशींचे भविष्य सुद्धा आज कसे बदलणार आहे याचा आढावा घेऊया. वाचा मेष ते मीन राशीचे भविष्य

१२ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.

वृषभ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल.

मिथुन:-मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत.

कर्क:-फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल.

सिंह:-आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.

कन्या:-विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.

तूळ:-कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल.

वृश्चिक:-नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल.

धनू:-कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

मकर:-जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.

कुंभ:-बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

हे ही वाचा<<लक्ष्मी नारायण २ जुलैपर्यंत ‘या’ ३ राशींच्या कुंडलीला देणार कलाटणी; तुमचे दार ठोठवणार धनलाभ व श्रीमंतीची संधी

मीन:-आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर