Horoscope Today 13 november 2025 : आज १३ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. आज ब्रम्ह योग जुळून येईल आणि मघा नक्षत्र जागृत असणार आहे आणि शुक्ल योग सुद्धा जुळून येतो आहे. राहू काळ १ वाजून २१ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. गुरुवारी तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १३ नोव्हेंबर २०२५ (Today Horoscope 13 November 2025 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)

आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. पूर्ण खात्री केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

तब्येतीची तक्रार कमी होईल. अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल. आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा. मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)

व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा. दिवस मध्यम फलदायी असेल. आपल्याच विचारात गर्क राहाल. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)

कामाचा व्याप वाढता राहील. सामाजिक संबंध जपले जातील. दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. विरोधक पराभूत होतील.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)

जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. काही तडजोडी कराव्या लागतील. कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)

आपल्याच मर्जीत दिवस घालवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील. स्व‍च्छंदीपणे सर्व गोष्टींकडे पहाल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)

काही कामे अडकून राहू शकतात. कामाच्या ताणाने निराश होऊ नका. आपली चिकाटी कायम ठेवा. लपवाछपवीचा मार्ग धरू नका. अपेक्षित उत्तराने खुश व्हाल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)

घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा. जवळचा प्रवास कराल. आवडत्या वस्तु खरेदी करता येतील.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)

जोडीदाराच्या मताचा आदर करावा. समाजात मान वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. भावंडांशी मतभेद संभवतात.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)

दिवस आपल्या मनाजोगा घालवाल. कामातील प्रयत्न फळाला येतील. सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)

उतावीळपणा करून चालणार नाही. फार विचार करत बसू नका. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर