13 September Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळ ग्रहाला विशेष मान दिला जातो. तो साधारणपणे एका राशीत ४५ दिवस राहतो. सध्या मंगळ कन्या राशीत होता, पण १३ सप्टेंबर म्हणजे आज तो कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राची रास असल्यामुळे तूळ राशीत मंगळ आल्याने काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, मंगळ आणि मिथुन राशीत असलेल्या गुरु बृहस्पतीच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे. हा शुभ योग झाल्याने १२ पैकी काही राशीच्या लोकांना खास लाभ मिळणार आहे. चला तर मग पाहूया गुरु-मंगळाचा नवपंचम राजयोग कोणत्या राशीसाठी भाग्यशाली ठरू शकतो…
ज्योतिष शास्त्रानुसार, भूमिपुत्र मंगल १३ सप्टेंबरला कन्या राशीतून निघून तूळ राशीत जाणार आहे. त्यामुळे मंगळ मिथुन राशीत पाचव्या स्थानी आणि गुरु तूळ राशीत नवव्या स्थानी राहतील, यामुळे नवपंचम राजयोग तयार होत आहे. सांगायचं तर, गुरु बृहस्पति सध्या मिथुन राशीत आहेत.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या दुसऱ्या भावात गुरु बृहस्पति आणि सहाव्या भावात मंगळ आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना आयुष्यातील जुने त्रास कमी होऊ शकतात. जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. वादविवादातूनही सुटका होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. मानसिक शांती मिळेल. त्यासोबतच सुख-समृद्धी मिळू शकते. नशिबाचाही आधार मिळू शकतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ-गुरुच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग अनेक क्षेत्रांत फायदा देऊ शकतो. या राशीच्या लग्न भावात गुरु बृहस्पति आणि पंचम भावात मंगळ राहतील. गुरुची दृष्टी असल्याने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात जलद वाढ होईल. लक्ष्मी स्थानाशी संबंध आल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच भविष्यासाठी बचत करणे शक्य होईल. मुलांबाबतची जुनी अडचण किंवा त्रास दूर होऊ शकतो. बुध्दीची तीव्रता नवीन सुरुवात करण्याचा आत्मविश्वास देईल. त्यामुळे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलात, तर त्यातून फायदा मिळू शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ-गुरुचा नवपंचम राजयोग खूप अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या नवव्या भावात मंगल आणि पंचम भावात गुरु आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत फायदा होऊ शकतो. गुरु बृहस्पतीची दृष्टी असल्याने शिक्षण आणि करिअरमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच नवपंचम राजयोगामुळे भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)