16 November Horoscope: मान-सन्मान, वडील आणि आत्म्याचे कारक असलेला सूर्य काही काळानंतर राशी बदलतो. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सध्या सूर्य आपल्या नीच राशी म्हणजे तूळ राशीत आहे. नीच राशीत असल्यामुळे सूर्याचे सकारात्मक परिणाम कमी दिसत आहेत.
पण १६ नोव्हेंबरपासून सूर्य नीचतेतून मुक्त होऊन वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच मंगळ आणि बुध आहेत, त्यामुळे सूर्य, मंगळ आणि बुध मिळून तिन्ही ग्रहांचा योग तयार होत आहे. या तिन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग, बुधादित्य योग आणि मंगळादित्य योग तयार होणार आहे. हा शक्तिशाली योग काही राशीच्या लोकांसाठी भाग्यवर्धक ठरू शकतो. सध्या मंगळ अस्त अवस्थेत असल्यामुळे त्याचा प्रभाव कमी आहे, पण सूर्याबरोबरच्या या युतीमुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले आहे. चला, पाहूया कोणत्या भाग्यवान राशी आहेत…
मेष राशी (Aries Zodiac Sign)
या राशीच्या अष्टम भावात सूर्य प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांचे बरेच दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते आणि धनलाभाचे योग तयार होत आहेत. मालमत्ता किंवा घर घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पण चांगला फायदा होईल. पण आरोग्याबाबत थोडे सावध राहा. चांगली जीवनशैली ठेवा आणि खाण्यापिण्याची काळजी घ्या.
कर्क राशी (Cancer Zodiac Sign)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश खूप शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बरीच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात सूर्य सहाव्या भावात प्रवेश करणार आहे. तसेच तूळ राशीत असलेला शुक्र सुख भावात आहे. त्यामुळे घर, वाहन किंवा मालमत्ता घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनाही मोठे यश मिळू शकते. आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही चांगला फायदा होईल.
सिंह राशी (Leo Zodiac Sign)
सूर्याची नीचता संपल्यामुळे या राशीच्या लोकांना खास फायदा होऊ शकतो. जरी या राशीवर शनिची साडेसाती सुरू असली, तरी गुरुच्या कृपेने चांगले परिणाम दिसू शकतात. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते आणि भौतिक सुखसुविधा वाढू शकतात. सूर्याची दृष्टी दहाव्या भावावर असल्यामुळे व्यापारातही चांगला नफा होऊ शकतो. सूर्य चौथ्या भावाचा स्वामी असल्यामुळे गृहस्थ जीवनातही आनंद आणि समाधान मिळू शकते. सर्व गोष्टी शांततेने सुटू शकतात. मात्र आरोग्याबाबत थोडे सावध राहणे आवश्यक आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
