Mercury Retrograde Effects :ज्योतिषशास्त्रानुसार १० नोव्हेंबर २०२५ पासून बुध ग्रह वक्री (retrograde) झाला आहे. आता तो २९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजून ७ मिनिटांनी वृश्चिक राशीत मार्गी होईल. बुध ग्रहाचा वक्री कालावधी साधारणपणे १८ दिवसांचा असेल आणि या काळात तो वृश्चिक राशीत राहील.
बुध हा संवाद, बुद्धिमत्ता, व्यापार, तर्कशक्ती आणि लेखनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या वक्री अवस्थेत या सर्व गोष्टींवर थेट परिणाम दिसून येतो. या काळात वाणीवर नियंत्रण, व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि निर्णयांमध्ये संयम आवश्यक असतो.
चला तर मग पाहूया, १२ राशींवर बुध वक्रीचा कसा परिणाम होणार आहे.
मेष राशी (Aries)
बुध वक्री असल्याने तुमच्या कामात उशीर होऊ शकतो. महत्त्वाची कामं थोडी थांबवून विचारपूर्वक करा. आर्थिक बाबतीत दक्ष राहा. अनावश्यक खर्च टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत अनपेक्षित बदल किंवा ट्रान्सफर होऊ शकते.
वृषभ राशी (Taurus)
वृषभ राशीसाठी बुधची उलटी चाल भाग्यवर्धक ठरणार आहे. अनेक स्त्रोतांतून पैसा मिळेल. जुने अडकलेले कामे पूर्ण होतील. एखाद्या कायदेशीर वा विवादित प्रकरणात विजय मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणी आणि लेखनातून यश मिळेल.
मिथुन राशी (Gemini)
तुमच्या राशीचा स्वामी बुधच असल्याने हा काळ मिश्र परिणाम देणारा आहे. धैर्याने निर्णय घ्या. शत्रू तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील, पण ते अपयशी ठरतील. वाणीचा प्रभाव वाढेल, मात्र विचार न करता बोलल्यास नुकसान होऊ शकते.
कर्क राशी (Cancer)
कर्क राशींसाठी बुध वक्री ज्ञान आणि प्रेम वाढवणारा आहे. जोडीदाराशी नातं दृढ होईल. गुरूजन किंवा वडीलधार्यांकडून मार्गदर्शन मिळेल. मुलांकडून सुख मिळेल आणि बौद्धिक पातळीत वाढ दिसून येईल.
सिंह राशी (Leo)
सिंह राशीवाल्यांसाठी बुधचा प्रभाव भूमी व वाहनसुख देणारा ठरू शकतो. पण आर्थिक अडचणी येऊ शकतात. पैशांबाबत विचारपूर्वक पावले उचला. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.
कन्या राशी (Virgo)
कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ भाऊ-बहिणींसोबतचे संबंध दृढ करणारा आहे. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील. वैयक्तिक जीवनात संतुलन राखल्यास आनंद मिळेल. करिअरमध्ये वेळ सामान्य राहील, पण स्थिरता मिळेल.
तूळ राशी (Libra)
तूळ राशीसाठी बुध वक्री धनलाभ आणि समृद्धी देणारा ठरेल. उत्पन्न वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. शत्रू पराभूत होतील. बौद्धिक कामांमध्ये यश मिळेल.
वृश्चिक राशी (Scorpio)
बुधची उलटी चाल तुमच्याच राशीत होत असल्याने हा काळ अत्यंत प्रभावशाली ठरेल. मान-सन्मान वाढेल, पण तुमचं स्वभावाचं तीव्रपण तुम्हालाच तोट्यात नेऊ शकतं. जोखीम घेणं टाळा. शांतता आणि संयम ठेवा.
धनु राशी (Sagittarius)
धनु राशीवाल्यांना बुध वक्री पद, पैसा आणि प्रतिष्ठा देऊ शकतो. मात्र पैशांबाबत सावधगिरी बाळगा. खर्च वाढतील, त्यामुळे बजेट सांभाळा. जलद निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.
मकर राशी (Capricorn)
मकर राशीवाल्यांसाठी हा काळ आर्थिक वृद्धी घडवून आणेल. इनकम वाढेल. मुलांबाबत आनंदाची बातमी मिळेल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते.
कुंभ राशी (Aquarius)
कुंभ राशीसाठी बुध वक्री करिअरमध्ये नवे संधी देणारा आहे. नवीन काम सुरू करणे, प्रोजेक्ट घेणे, शिकण्यास सुरुवात करणे – सर्व गोष्टींसाठी हा उत्तम काळ आहे. मात्र लालच आणि फसवणुकीपासून दूर राहा.
मीन राशी (Pisces)
मीन राशीवाल्यांना या काळात भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. कुटुंबाचा आधार मिळेल. आरोग्य चांगलं राहील. अडकलेली कामं सहज पूर्ण होतील.
