25th April 2024 Panchang & Rashi Bhavishya: २५ एप्रिल २०२४ ला चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष प्रतिपदा व द्वितीया तिथी आहे. या दिवशी विशाखा नक्षत्रात व्यतिपात योग जुळून येणार आहे. गुरूवारच्या या शुभ दिवशी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आजच्या दिवशी दुपारी १ वाजून ५७ ते मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. आजचा दिवस पंचांगानुसार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार हे पाहूया ..

२५ एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत खेळत कामे कराल. चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या.

वृषभ:-जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. महत्त्वाचे कागदपत्रे तपासून पहावीत. चारचौघांत मिळून मिसळून वागाल.

मिथुन:-तरुण वर्गाशी मैत्री कराल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. क्षणिक सौख्यात रमून जाल.

कर्क:-मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.

सिंह:-सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. अनपेक्षित लाभणे खुश व्हाल.

कन्या:-परोपकाराची जाणीव ठेवाल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. दिवस मजेत जाईल. प्रकृतीची हेळसांड करू नका.

तूळ:-जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक:-प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

धनू:-सामाजिक कार्यात भाग घ्याल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

मकर:-कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमप्रकरणातील घनिष्टता वाढेल.

कुंभ:-आततायीपणे निर्णय घेऊ नका. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनातील नैराश्य बाजूस सारावे. प्रवासाचा योग येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< १ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती

मीन:-आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर