25th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : २५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी आज रात्री ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत राहणार आहे. आज रविवारी ध्रुव योग असणार आहे. तर भरणी नक्षत्र आज दुपारी ४ वाजून ४५ पर्यंत राहील. आज राहू काळ दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी ६ पर्यंत असणार आहे.. याशिवाय २५ ऑगस्ट रोजी रात्री एक वाजून १६ मिनिटांनी शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. तर सुट्टीचा दिवस रविवार मेष ते मीन राशींचा कसा जाणार आहे हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

२५ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- दिवस मनासारखा घालवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ:- मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवसभर कामाची धांदल राहील.

मिथुन:- लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल.

कर्क:- उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह:- गुंतवणूक विचारपूर्वक करावी. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींकडे कल राहील. क्षुल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो.

कन्या:- तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. जोडीदाराला खुश करावे.

तूळ:- मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. आपले विचार ठामपणे मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधाल. मनातील नसत्या कल्पना काढून टाका.

वृश्चिक:- उधारी वसूल करण्याच्या मागे लागा. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.

धनू:- अति गोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. घरात शांतता नांदेल. धार्मिक कामाकडे कल राहील.

मकर:- घरासाठी खरेदी केली जाईल. चिकाटीने कामे करावीत. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

कुंभ:- सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. नातेवाईकांची खुशाली कळेल. बौद्धिक कामात लक्ष घालाल. तिखट शब्द टाळावेत. खर्च मर्यादित ठेवावा.

मीन:- दिवस मनासारखा घालवाल. धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर