25th September Rashi Bhavishya & Panchang : आज २५ सप्टेंबरला भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज अष्टमी तिथी असणाऱ्यांचे श्राद्ध केले जाईल. आज वरियान योग जुळून आला आहे. वरियान योग रात्री १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज रात्री १० वाजून २४ मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असेल. बुधवारी राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर उद्याचा दिवस मेष ते मीनसाठी कसा असेल हे आपण जाणून घेऊ या…

२५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.

वृषभ:- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी.

मिथुन:- कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.

कर्क:- आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल.

सिंह:- अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.

कन्या:- मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

तूळ:- महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.

वृश्चिक:- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल.

धनू:- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.

मकर:- अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.

कुंभ:- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.

मीन:- काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर