26 March 2024 Panchang & Marathi Horoscope: २६ मार्च २०२४ ला फाल्गुन मासातील कृष्ण पक्ष द्वितीया तिथी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज, हस्त नक्षत्रात ध्रुव योग असणार आहे. या दिवशी दुपारी ११ वाजून ५५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे तर राहू काळ दुपारी ३ वाजून २१ मिनिटांपासून ते ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजच्या दिवशी चंद्र कन्या राशीत स्थिर असणार आहे. आजच्या दिवशीचे मेष ते मीन राशीच्या कुंडलीत कोणते बदल अपेक्षित आहेत याचा आढावा पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ मार्च २०२४: मंगळवारचे राशी भविष्य

मेष:-आवडते खेळ खेळाल. मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल. लहानांशी मैत्री कराल.

वृषभ:-कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील. घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांचे भर भरून कौतुक कराल.

मिथुन:-जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे बंधन पाळावे लागेल.

कर्क:-घरगुती कामात दिवस जाईल. आपलेच म्हणणे खरे कराल. नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल.

सिंह:-तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो. मुलांची समस्या दूर करावी.

कन्या:-पचनाचा त्रास जाणवेल. गप्पांमधून मतभेद वाढू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.

तूळ:-कमी श्रमात कामे करण्याकडे भर राहील. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल. सासुरवाडीचे लोक भेटतील. अचानक धनलाभ संभवतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल.

वृश्चिक:-पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल. महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

धनू:-नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.

मकर:-कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत. पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. थोडीफार दगदग वाढू शकते.

कुंभ:-बौद्धिक चलाखी दाखवाल. समय सूचकता ठेवावी लागेल. फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.

हे ही वाचा<< ३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

मीन:-सामाजिक दर्जा उंचावेल. मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 march panchang marathi rashi bhavishya today for mesh to meen zodiac signs money benefits to love relations astrology news svs
First published on: 25-03-2024 at 19:02 IST