3 April 2024 Marathi Rashi Bhavishya: आज ३ एप्रिल म्हणजेच फाल्गुन शुक्ल पक्षातील नवमी तिथीला शिव योग जुळून आला आहे. आज बुधवारी कोणताही अभिजात मुहूर्त नाही पण आजचा दिवस एकूणच शुभ आहे. केवळ दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपासून ते १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. आजच्या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या कुंडलीत काय लिहिलंय हे पाहूया..

३ एप्रिल २०२४ मराठी राशी भविष्य

मेष:-घरगुती गोष्टींवर लक्ष घाला. धार्मिक कामात मदत कराल. मानसिक तान वाढू शकतो. त्यागाचे महत्त्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.

वृषभ:-काही कामे सहजगत्या पार पडतील. कामातील बदल नीट लक्षात घ्यावेत. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. लोक तुमच्यावर खुश होतील. अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्या.

मिथुन:-जोडीदाराच्या सहवासाचे सौख्य वाढेल. वेळेवर कामे पूर्ण करावीत. साथीच्या रोगांपासून काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणामुळे निराश होऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल.

कर्क:-जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. काही कामात अनपेक्षीतता येईल. भागीदाराशी मतभेद संभवतात. कचेरीच्या कामात वेळ जाईल. वरिष्ठांना खुश करावे लागेल.

सिंह:-छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. कष्टाने कामे पार पडतील. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून त्रास संभवतो. उष्णतेचे त्रास संभवतात.

कन्या:- मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. वेळ चुकवून चालणार नाही. प्रेमप्रकरणात कटकट वाढेल. उधळेपणा करू नका.

तूळ:-कौटुंबिक खर्च वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्या. घरासंबंधीचे प्रश्न सोडवावेत. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक:-तुमच्यातील हिंमत वाढीस लागेल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा व्याप वाढेल. हाती आलेली संधी सोडू नका. नातेवाईकांच्या कुरबुरी वाढू शकतात.

धनू:-आवश्यकता असेल तरच खरेदी करा. मानसिक व्यग्रता जाणवेल. औद्योगिक वाढीकडे लक्ष द्यावे. कोर्ट-कचेरीची कामे निघतील. मागचा पुढचा नीट विचार करावा.

मकर:-कामातील अडचणी दूर करव्यात डोकेदुखीचा त्रास जाणवेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. स्वभावात हट्टीपणा येईल. उत्साहाने कामे करावीत.

कुंभ:-जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जुनी प्रकरणे सामोरी येऊ शकतात. आर्थिक बाबीची चिंता सतावेल. वादविवादात लक्ष घालू नका. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार

मीन:-मौल्यवान वस्तु खरेदी कराल. कष्टाला पर्याय नाही. बौद्धिक डावपेच खेळाल. चातुर्याने कामे मिळवाल. कामाचा थकवा जाणवेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर