3 August Sun Transit Horoscope: सूर्याची बदलती चाल राशींना शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम देते. काही तासांत ग्रहांचा राजा सूर्य आपली चाल बदलणार आहे, ज्याचा परिणाम सगळ्या राशींवर होणार आहे.

पंचांगानुसार, ३ ऑगस्ट रोजी पहाटे ४:१६ वाजता सूर्य अश्लेशा नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे. सूर्य अश्लेशा नक्षत्रात १६ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यामुळे सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे काही राशींना खूप शुभ परिणाम मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया की सूर्याच्या बुध नक्षत्रातील गोचरामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे.

उद्यापासून ‘या’ ३ राशींचा चांगला काळ सुरू (3 August Horoscope Sun Transit Benefits to Zodiac Signs)

तूळ राशी (Libra Horoscope)

सूर्याच्या बुध नक्षत्रातील गोचरामुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतील. व्यापारात धन लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना बॉस आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. तसेच वैवाहिक जीवनातही मान-सन्मान टिकून राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचे बुध नक्षत्रातील गोचर फायद्याचं मानलं जात आहे. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. समाजात नाव आणि काम दोन्हींचा मान-सन्मान मिळेल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही लोक आपल्या लहान बहिणीसोबत वेळ घालवतील. सूर्याच्या कृपेने अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचा बुध नक्षत्रात प्रवेश खूप शुभ मानला जात आहे. व्यापारातील अडचणी कमी होऊ लागतील. सूर्याच्या कृपेने विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल. मुलांबाबत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्य देखील ठीक राहील. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील.