30th March 2024 Marathi Horoscope Today: आज ३० मार्च २०२४ ला फाल्गुन कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आजचा दिवस म्हणजेच शनिवारी योगायोगाने अनुराधा नक्षत्र जागृत असेल. द्रिक पंचांगानुसार आज रात्री १० बाजून ४७ मिनिटांपर्यंत सिद्धी योग असणार आहे. काही राशींना याचा लाभ अनुभवता येऊ शकतो. आज सकाळी १० वाजून ५२ मिनिटांनी राहू काळ संपणार आहे, त्यामुळे उर्वरित दिवस आपल्यासाठी शुभ असेल. मार्च महिन्यातील शेवटच्या शनिवारी तुमच्या राशीचे नशीब चमकणार की आणखी कष्टदायी होणार हे पाहूया.

३० मार्च, शनिवार: मेष ते मीन राशीचे भविष्य

मेष:-एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार कमी होईल. हातात नवीन अधिकार येतील.

26th April Panchang & Daily Marathi Rashi Bhavishya
२६ एप्रिल पंचांग: मेष, वृषभ व कर्कसहित ‘या’ राशींना आज मोठा फायदा; दुःख दूर करेल आजचा अभिजात मुहूर्त
13th April Panchang & Rashi Bhavishya
१३ एप्रिल पंचांग: कामात प्रगती ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल शनिवार?
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?
3 April 2024 Panchang Horoscope Today
३ एप्रिलचे १२ राशींचे भविष्य व पंचांग: वृषभ, सिंहसह ‘या’ राशींचा आजचा दिवस असेल आनंदी; तुमची रास काय सांगते?

वृषभ:-कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. तात्विक गोष्टींवर मतभेद संभवतात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

मिथुन:-कमिशन मधून लाभ मिळेल. नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको. काही कामे अधिक वेळ घेतील.

कर्क:-मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.

सिंह:-पित्त विकार बळावू शकतात. सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल. सौंदर्यप्रसाधनेच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्यातील चांगल्या गुणांची दाखल घेतली जाईल.

कन्या:-कौटुंबिक सौख्य वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल. मनाची विशालता दाखवाल. उच्च रहाणीमानाची आवड जोपासाल.

तूळ:-दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालावे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

वृश्चिक:-मानसिक चांचल्य जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. मुलांशी मतभेद संभवतात. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील.

धनू:-व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील. योग्य संधीची वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

मकर:-उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमचा तर्क अचूक ठरेल. अती चौकसपणा दाखवू नका.

कुंभ:-कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल. ध्यान धारणे साठी वेळ द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कोर्ट-कचेरीची कामे निघतील.

हे ही वाचा<< १३ दिवस केंद्र त्रिकोण राजयोग कायम; ‘या’ राशींना लाभतील सुगीचे दिवस; ‘या’ रूपात होईल लक्ष्मीचं आगमन

मीन:-व्यवसाय वृद्धीकडे मार्गक्रमण करावे. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. धूर्तपणे वागणे ठेवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर