Aajche Rashi Bhavishya In Marathi 31 October 2025 : आज ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी असणार आहे. आज वृद्धि योग जुळून येईल आणि धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ २ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर मेष ते मीन राशीचा महिन्याचा शेवटचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२५ (Rashi Bhavishya 31 October 2025 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांति मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
