5 August Horoscope: श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. यंदा पुत्रदा एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे शुभ योग बनत आहेत, जे ४ राशींसाठी खूपच शुभ ठरू शकतात.
हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीचं व्रत खूप खास मानलं जातं. हे व्रत त्या जोडप्यांसाठी विशेष असतं, जे मुलाच्या सुखापासून वंचित आहेत आणि मुलाची इच्छा ठेवतात. ज्यांना मुलं आहेत, त्यांना ही एकादशी दीर्घायुष्य, सौभाग्य आणि समृद्धी देते. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केल्याने हवी तशी इच्छा पूर्ण होते.
या वर्षी ५ ऑगस्ट २०२५ रोजी (मंगळवारी) पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग देखील बनत आहे. हे शुभ योग आणि पुत्रदा एकादशीचा दिवस ४ राशींसाठी श्रीहरीची खास कृपा घेऊन येईल. या लोकांना धन लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.
मेष राशी (Aries Horoscope 5 August)
मेष राशीच्या लोकांसाठी श्रावणाची एकादशी यश देणारी आहे. तुम्ही नवीन योजना करत असाल तर निडरपणे त्यावर काम सुरू करा. करिअरमध्ये प्रगती होईल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. घरात आणि परिवारात आनंद राहील. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope 5 August)
मिथुन राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. घरात आनंद आणि शांती राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. अशा लोकांची भेट होऊ शकते, जे तुमच्या मनाला शांतता देतील.
धनु राशी (Sagittarius Horoscope 5 August)
धनु राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रवास करण्याची शक्यता आहे. धर्म-कार्यांमध्ये आवड वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. अचानक धन लाभ होऊ शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope 5 August)
कुंभ राशीच्या लोकांसाठी ५ ऑगस्टचा दिवस शुभ आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. घरात आनंदाचं वातावरण राहील. थांबलेली योजना पुन्हा सुरू होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)