5th June Panchang & Marathi Horoscope: ५ जून २०२४ ला वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असणार आहे. बुधवारी चतुर्दशी तिथी संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. ५ जूनला रात्री १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग असणार आहे. बुधवारी रात्री ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांपासून ते २ वाजून ४ मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

५ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. आर्थिक कमतरता भरून निघेल. मानसिक चंचलता दूर करावी.

वृषभ:-मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल.

मिथुन:-कामाचा व्याप वाढू शकतो. भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

कर्क:-जवळच्या मित्रमैत्रिणींची गाठ पडेल. बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

सिंह:-शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील.

कन्या:-जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. पित्त विकारात वाढ संभवते. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते.

तूळ:-क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आळस झटकून कामे करावी लागतील.

वृश्चिक:- जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. आपली संगत एकवार तपासून पहावी.

धनू:-जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. समोरील कामे आधी पूर्ण करावीत. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील.

मकर:-क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ:-हलका व सकस आहार घ्यावा. वादाचे प्रसंग चिघळू शकतात. जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टीपासून दूर राहू नका.

हे ही वाचा<< नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

मीन:-दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर