8th July Panchang & Rashi Bhavishya Marathi: आषाढ महिन्यातील पहिल्या सोमवारी म्हणजेच आज ८ जुलै २०२४ ला तृतीया तिथी असणार आहे. संपूर्ण दिवस व रात्र तृतीया तिथीचा कायम असेल. आज सोमवारचा संपूर्ण दिवस व रात्री २ वाजून ६ मिनिटांपर्यंत वज्र योग असणार आहे. आज सकाळी ६ वाजताच पुष्य नक्षत्र संपुष्टात आल्याने आजच्या दिवसावरही त्याचा शुभ प्रभाव कमी अधिक स्वरूपात कायम असेल. आजचा दिवस पंचांगानुसार शुभ असला तरी सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे त्यामुळे या कालावधीत केलेल्या कामाचा प्रभाव शुभ असेल. आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या भाग्यात काय आहे हे पाहूया..

८ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

वृषभ:-हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील.

मिथुन:-कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

कर्क:-घरगुती कामे वाढीव राहतील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केन्द्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.

सिंह:-स्वावलंबी बनावे लागेल. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अति उत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.

कन्या:-मनाची ताकद ओळखा. नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतु साध्य होईल.

तूळ:-मनातील शंका काढून टाकावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.

वृश्चिक:-बोलण्यात तिरकसपणा आणू नका. उगाच विरोधाला विरोध करू नका. मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

धनू:-मनातील भावना व्यक्त कराव्यात. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

मकर:-इतरांवर अवलंबून राहू नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.

कुंभ:-भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

हे ही वाचा<< पुढचे २६८ दिवस पैसाच पैसा! शनीच्या कृपेने ‘या’ चार राशीधारकांच्या आयुष्यात सुख-समृद्धी

मीन:-परस्पर संवादाने कामे होतील. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर