9th September Rashi Bhavishya & Marathi Panchang : ९ सप्टेंबर ही भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीचा प्रारंभ होत आहे. ही षष्ठी तिथी सोमवारी रात्री ९.५४ पर्यंत राहील.९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३२ पर्यंत वैधृती योग राहील. तसेच विशाखा नक्षत्र सोमवारी संध्याकाळी ६.०४ पर्यंत राहील. याशिवाय ९ सप्टेंबरला सूर्यषष्ठी व्रत देखील आहे. आज सकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी ते ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे, पण अन्यथा हा दिवस शुभ असेल. आजच्या दिवशी तुमच्या राशीला नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

९ सप्टेंबर पंचांग व राशी भविष्य (9th September Rashi Bhavishya & Panchang )

मेष:-अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

वृषभ:-मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. धीराने कामे करावीत.

मिथुन:-घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल.

कर्क:- योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.

सिंह:- कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल.

कन्या:- विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे. आपण आणि आपले काम एवढेच पहा.

तूळ:- घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जुने वाद मिटू शकतील.

वृश्चिक:- गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. मानसिक प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल.

धनू:-उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मकर:-जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.

कुंभ:-कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन:-सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील. बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर