Horoscope Today In Marathi, 5 July 2025: ५ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल. रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १०:३० वाजेपर्यंत असणार आहे. तर आज स्वाती नक्षत्र तुमच्यासाठी काय घेऊन येणार हे जाणून घेऊया…
५ जुलै २०२५ पंचांग (Today Horoscope In Marathi, 5 July 2025 )
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू द्याल. गरजेच्या कामात अधिक वेळ घालवा. आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
मनात आशेचा नवीन किरण उठेल. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला मिळेल. जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. मनात उगाचच नसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)
आर्थिक प्रश्न सुटतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल. कौटुंबिक जबाबदार्या वाढतील. उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
आर्थिक बाबतीत आपण सतर्क राहाल. कामाची घाई-गडबड राहील. त्यामुळे अधिक वेगाने कामे पूर्ण करावी लागतील. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिरता जपावी.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. आरोग्यात सुधारणा संभवते. मानसिक समाधान लाभेल. कालगुणांना वाव द्यावा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
तडजोडीला पर्याय नाही हे ध्यानात घ्यावे. मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा. अति विचार करणे योग्य नाही. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. द्विधा मनस्थिती बाहेर पडावे लागेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
क्षुल्लक गोष्टीवर अडून राहू नका. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. ओळखीतून कामे होण्याची शक्यता. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
हातातील कामात मनाजोगे यश येईल. सहकारी तुम्हाला वेळेवर मदत करतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल. आपला आनंद आपणच शोधावा. जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)
साहसाने कामात हात घाला. प्रवास जपून करावा. नवीन उद्दीष्ट सावधपणे हाताळा. अकारण आलेली निराशा झटकून टाका. कौटुंबिक कामात मन रमेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)
वादाचे मुद्दे फार ताणू नका. आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)
मानसिक उत्साह वाढेल. आज कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. अधिक जोमाने कामे कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर