Astrology: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ ४ राशीचे लोक कोणाच्या दबावाखाली करत नाहीत काम!

जाणून घ्या अशा ४ राशींबद्दल ज्याचे लोक नेहमी ताठ मानेने जगतात आणि ते कोणाच्याही दबावाखाली कोणतेही काम करत नाहीत.

zodiac-sign-3
फोटो: जनसत्ता

ज्योतिष शास्त्रात ९ ग्रह आणि १२ राशींचे वर्णन केले आहे. या १२ राशींच्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगळे असते. तसेच या लोकांचे करिअर आणि कार्यक्षेत्रही वेगळे असते. आज आम्ही अशा ४ राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे लोक नेहमी ताठ मानेने जगतात आणि ते कोणाच्याही दबावाखाली कोणतेही काम करत नाहीत. ते त्यांच्या मनाने वागतात. पण कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी कोणी दबावाखाली काम करून घेण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात दबावात येत नाहीत. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

मेष (Aries)

मेष राशीचे लोक खूप उत्साही असतात. ते स्वभावाने अतिशय निर्भय असतात आणि प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभाग घेतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीवर मंगळाचे राज्य असते आणि मंगळ हा धैर्य आणि निर्भयपणाचा कारक मानला जातो. त्यामुळे ते कोणाच्या दबावाखाली काम करत नाहीत. जर कोणी त्यांना प्रेमाने काम करायला लावले तर ते ते नक्कीच करतात. या लोकांना त्यांचा स्वाभिमान खूप आवडतो, त्यामुळे त्यांना कोणाच्याही समोर झुकायला आवडत नाही.

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ४ राशींचे लोक असतात खूप भावनिक, अनेकदा घेतला जातो त्यांचा फायदा)

वृश्चिक (Scorpio)

या राशीचे लोक खूप मेहनती असतात, ते कोणत्याही क्षेत्रात जात असताना नेहमीच उच्च स्थान प्राप्त करतात. या राशीचे लोक प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात. जर एखाद्या व्यक्तीने वृश्चिक राशीच्या लोकांशी छेडछाड केली किंवा त्यांची फसवणूक केली, तर ते त्याला धडा शिकवूनच सुटकेचा नि:श्वास सोडतात. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ देखील आहे, जो त्यांना धैर्य आणि निर्भयपणा देतो. हे लोकही कोणाच्या दबावाखाली काम करत नाहीत.

(हे ही वाचा: बुध ६८ दिवस राहणार मकर राशीत! ‘या’ ५ राशींना शेअर्स आणि बिझनेसमध्ये फायदा होण्याची प्रबळ शक्यता)

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीचे लोक जे काही एकदा ठरवतात ते पूर्ण करूनच शांत बसतात. या राशीचे लोक खूप आत्मविश्वासी असतात. मात्र, हट्ट त्यांच्या स्वभावात आहे. ते अतिशय बुद्धिमान असतात. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळते. कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य आहे, ज्यामुळे ते मेहनती आणि स्वाभिमानी बनतो. ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी डोके वर करून राहतात.

(हे ही वाचा: ‘या’ ३ राशीचे लोक असतात मल्टी टास्कर्स आणि प्रतिभावान; बघा तुमची राशी यात आहे का)

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांचा हेतू खूप मजबूत असतो. त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यात ते पटाईत आहेत. या राशीचे लोक कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. हे लोक कष्टाळू आणि मेहनतीही असतात. तसेच त्यांची कार्यशैली वेगळी आहे. मकर राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे, जो त्यांना स्वाभिमानी बनवतो. त्यांना कुणापुढे झुकायला आवडत नाही.


(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to astrology people of these 4 zodiac signs do not work under any pressure ttg

Next Story
आजचं राशीभविष्य, रविवार, ९ जानेवारी २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी