Acharya Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतातील खूप मोठे विद्वान होते. चाणक्य यांनी नीति शास्त्राची रचना केली. ज्याला ‘चाणक्य निती’ या नावाने ओळखले जाते. चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.  चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये मुलांच्या संगोपनावर वारंवार भर दिला आहे की, पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण बनवावे, त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना वाया जाऊ देऊ नये.

मुलांची पहिली शाळा त्यांचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यांवर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे. चाणक्यांनी सांगितले आहे की, जर घरातील मुलगा वाईट असेल म्हणजेच चांगले कर्म करणारा नसेल तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो.  

एकेन शुष्कवृक्षेण दह्यमानेन वह्निना । 

दह्यते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा ॥

या नीतीमध्ये चाणक्य श्लोकांच्या माध्यमातून सांगत आहेत की, ज्याप्रमाणे एखाद्या सुकलेल्या झाडाला आग लागली की संपूर्ण जंगल जळून राख होते. त्याचप्रमाणे, एका वाईट मुलामुळे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले तर. दुष्ट आणि अवज्ञाकारी मुले संपूर्ण घराचा सन्मान नष्ट करतात आणि संपूर्ण कुळाचा नाश करतात, असे ते सांगतात.

(हे ही वाचा : Chanakya Niti: घरात गरीबी येण्याआधी मिळतात ‘हे’ ५ संकेत; तुम्हालाही दिसल्यास ओढावू शकते दारिद्र्य, वेळीच व्हा सावध! )

चाणक्य म्हणायचे, जंगलातील एक झाड जरी सुकले आणि आग लागली, तर आजूबाजूची झाडे जरी हिरवीगार असली, तरी ते सुकलेले झाड संपूर्ण जंगलाला आगीत वेढून टाकते आणि संपूर्ण जंगल जळून खाक होतो. त्याचप्रमाणे वाईट प्रवृत्ती असलेले मूल कितीही सुंदर असले तरी एक ना एक दिवस ते कुटुंबाचा आणि कुळाचा अभिमान नष्ट करतात. समाजात त्याच्या वाईट वागणुकीमुळे कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. एक दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा आदर आणि सन्मान नष्ट करू शकतो, असे चाणक्यांनी नमूद केले आहे.

मुलांवर संस्कार करणे खूप महत्वाचे

चाणक्य म्हणतात की, मुलांच्या वाईट सवयींकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना वेळीच सुधारणे खूप महत्वाचे आहे. कुटुंबाचा विनाश थांबवायचा असेल तर मुलांना नियंत्रणात ठेवा आणि त्यांच्या संस्कारांकडे लक्ष द्या. एक उत्कृष्ट आणि आज्ञाधारक मूल संपूर्ण कुळ पुढे नेतो. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर भविष्य अंधारात असेल, असे ते सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)