Vastu Tips Calendar: नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्ष सुरु होताच घरातील कॅलेंडर बदलले जाते. वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते. खरंतर, वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत. असे मानले जाते की, कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते. चला तर मग आज आपण जाणून घेऊया वास्तुनुसार घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे.

वास्तुनुसार जुने कॅलेंडर काढावे?

काही ज्योतिषाचार्यांनुसार, घरातील जुने कॅलेंडर हटविणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही, असे सांगितले जाते. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टीं घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये. वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे, असा सल्ला दिला जातो.

(हे ही वाचा : मीन राशींच्या लोकांसाठी २०२३ वर्ष असेल भरभराटीचे? शनिच्या कृपेने मिळू शकतात अनेक चांगल्या बातम्या)

कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? (Calendar Direction as per Vaastu)

अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्याठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून देतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही घरी लावलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? ते योग्य दिशेला लावले आहे का? वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत. त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील भिंतीला लावू शकतो. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तुनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते असे मानले जाते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य देवाची दिशा देखील पूर्व आहे. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)