Shani enter in meen rashi: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. नवग्रहामध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागतो.

२०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून तब्बल ३० वर्षानंतर मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनीने १७ जानेवारी २०२३ रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता. अडीच वर्षानंतर आता येत्या २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे शनीचे हे राशी परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

शनीचा मीन राशीत प्रवेश

कुंभ

शनीचे मीन राशीतील गोचर कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल.

वृषभ

शनीचा मीन राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.

तूळ

शनीच्या मीन राशीतील राशी परिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)