ज्योतिषशास्त्रात वरुण ग्रहाचाही उल्लेख आढळतो. यालाच आपण नेपच्यून या नावाने देखील ओळखतो. हा ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहे. तब्बल १४ वर्षांनी वर्षांनंतर ११ सप्टेंबर २०२२ रोजी वरुण ग्रह आपली राशी बदलणार आहे. या दिवशी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी वरुण ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषी म्हणतात की वरुण ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी १४ वर्षे लागतात आणि त्यामुळे त्याचे राशीचक्र १६४ वर्षांत पूर्ण होते.

ज्योतिषी सांगतात की व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ज्या घरात वरुण ग्रह स्थित असतो, त्या व्यक्तीला त्या घराशी संबंधित लाभ होतात. या ग्रहाचे कुंभ राशीतील संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना या काळात आर्थिक फायदे होणार आहेत. वरुण ग्रहाचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे, जाणून घेऊया.

Astrology: कुंडलीतील ‘हे’ संकेत सांगतात तुमच्यावर देवाची कृपा आहे की नाही! जाणून घ्या

  • वृषभ

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ आहे. वरुण ग्रहाच्या कुंभ राशीतील संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या दरम्यान, तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल आहे. या लोकांना या काळात भरपूर यश मिळेल.

  • कुंभ

या राशीच्या लोकांसाठीदेखील हे संक्रमण खूप खास असणार आहे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही या काळात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही नोकरीसोबत व्यवसायही सुरू करू शकता.

  • कन्या

या काळात कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात विशेष वाढ होईल. या काळात तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची भरपूर संधी मिळेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांनाही विशेष लाभ होईल. या काळात तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. नवीन नोकरीचा शोध लवकरच पूर्ण होऊ शकतो.

सूर्य आणि गुरूने मिळून तयार केला ‘महाविनाशक षडाष्टक योग’; ‘या’ राशींच्या अडचणीत होणार वाढ; त्वरित व्हा सावध

  • कर्क

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुख मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत राहील. व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होईल. दुसरीकडे, जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर हे स्वप्न लवकरच होऊ शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

  • मकर

या राशीच्या लोकांसाठी नेपच्यूनचे संक्रमण विशेष फलदायी ठरेल. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. एवढेच नाही तर या संक्रमणामुळे तुमच्या लोकप्रियता वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या काळात प्रवासाचे योग तयार होत आहेत. मान-सन्मान मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)