Venus Transit In Dhanu: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दिवाळीचा सण १ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. दिवाळीनंतर,७ नोव्हेंबर रोजी, ऐश्वर्य आणि वैभवाचा दाता शुक्र राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच, या राशींना स्थान, वैभव आणि ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

कुंभ राशी

शुक्राचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हे गोचर या राशीच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच, यावेळी या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात कुभ राशीच्या लोकांना आर्थिक आणि गुंतवणुकीच्या बाबतीत लाभ मिळेल. तसेच, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच, यावेळी तुम्हाला स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.

हेही वाचा –५०० वर्षांनी दिवाळीला शनि आणि गुरुचा होणार दुर्मिळ संयोग! या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअमध्ये प्रगतीसह मिळेल पैसाच पैसा

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर शुभ ठरू शकते. कारण हे गोचर या राशीतून नवव्या घरात होणार आहे. त्यामुळे या काळात या राशीचे लोक भाग्यवान ठरू शकता. तसेच तुमचे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यावेळी मेष राशीच्या लोांना नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. तसेच करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळेल आणि सर्वजण तुमच्या कल्पनांचे स्वागत करतील. तसेच या काळात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील.

हेही वाचा –लक्ष्मीपूजनापूर्वी ५ मोठे ग्रह करणार गोचर, लक्ष्मी देणार ‘या’ पाच राशींना दिवाळी गिफ्ट, मिळणार अपार पैसा

मिथुन राशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण हे होत तुमच्या राशीतून सातव्या भावात होणार आहे. त्यामुळे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल. यावेळी या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल. यावेळी, अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील. यावेळी त्यांच्या कुटुंबाकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. या काळात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.