नोव्हेंबर महिन्यात बुद्धीचे देवता मानले जाणारे बुधदेव वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधदेव २६ ऑक्टोबरपासून तूळ राशीमध्ये असून ते १३ नोव्हेंबरला राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार कोणताही ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा सर्वच राशींवर परिणाम होतो. बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहुयात.

  • वृषभ

या राशी परिवर्तनाच्या वेळी बुध ग्रह वृषभ राशीच्या कुंडलीच्या सातव्या घरात राहील. या काळात या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्र आणि व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर या लोकांना इतरही फायदे होण्याची संभावना आहे.

Numerology: नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक असतात खूपच खास; ‘या’ क्षेत्रात मिळवू शकतात प्राविण्य

  • सिंह

बुध ग्रहाचे हे राशी परिवर्तन सिंह राशीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात होणार आहेत. या काळात सिंह राशीचे लोक वाहन खरेदी करू शकतात. तसेच, त्यांना धनलाभही होऊ शकतो. घरामध्ये आनंदी वातावरण राहू शकते. तसेच सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे.

  • तूळ

बुध ग्रहाचे हे राशी परिवर्तन तूळ राशीच्या कुंडलीच्या चौथ्या घरात होणार आहेत. या काळात या राशीचे लोक विदेश दौरा करू शकतात. तसेच, या काळात धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत. उत्पन्नात वाढ होऊन कुटुंबियांमधील नातेसंबंध दृढ होऊ शकतात. वैयक्तिक जीवनासाठी हा काळ उत्तम सिद्ध होऊ शकतो.

Guru Margi 2022 : २४ नोव्हेंबरनंतर काहींना मिळू शकते शुभ वार्ता, तर काहींच्या अडचणीत होणार वाढ

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या आठव्या घरचा स्वामी बुध ग्रह असल्याने या काळात या लोकांना बुधदेवाची साथ मिळू शकते. व्यापारात नफा होऊ शकतो तसेच, करिअरमध्येही चांगले परिणाम मिळू शकतात.

  • कुंभ

या राशीच्या पाचव्या आणि आठव्या घरचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या राशी संक्रमणामुळे या राशीच्या लोकांसाठी फायद्याच्या नव्या संधी तयार होऊ शकतात. नावे काम सुरू करायचे असल्यास ही वेळ शुभ सिद्ध होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)