Ajche Rashi Bhavishya 12 June 2025 : १२ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी २ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी २ वाजून ५ मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. संध्याकाळी ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. शुभ योगात कोणत्या राशींच्या आयुष्यात गुड न्युज येणार जाणून घेऊया…
१२ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Horoscope Today in Marathi, 12 June 2025)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
नियोजनबद्ध कामे करावीत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्या व्यक्ति तुमच्यावर नाराज होऊ शकतात. प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल. थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
प्रेमप्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. रेस जुगारातून नुकसान संभवते. चोरांपासून सावध राहावे. मानसिक ताण काहीसा वाढू शकतो. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
जवळच्या मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीवर मात करता येईल. उष्णतेचा विकार बळावू शकतो. पित्त प्रकृती असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
जवळचा प्रवास टाळलेलाच बरा. भावंडांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. नसते साहस महागात पडू शकते. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. अचानक काही खर्च सामोरे येतील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. बोलताना शब्दांचे भान ठेवावे. मत्सराला बळी पडू नका.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
उगाच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. अपचनाचा त्रास वाढू शकतो. कापणे, भाजणे यांसारखे किरकोळ त्रास संभवतात. परिस्थितीला नांवे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धैर्याने नवीन कामाला सामोरे जा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर