Horoscope For Your Sign : आज ७ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रात्री १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील. आज गुरुवारी धृती योग सकाळी ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तर पूर्वाषाढा नक्षत्र रात्री ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच आजचा राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा गुरुवार १२ राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

७ नोव्हेंबर पंचाग व राशिभविष्य :

मेष:- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन चालाल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल.

Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

वृषभ:- आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. फार काळजी करत बसू नये.

मिथुन:- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदाराबरोबर मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.

कर्क:- कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. कोणालाही शब्द देऊ नका.

सिंह:- प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरी मधून लाभ मिळू शकतो.

कन्या:- आज देवीचा आशीर्वाद मिळेल. मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल.

तूळ:- आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:- बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

धनू:- आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. आवडते छंद जोपासाल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा.

मकर:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ:- आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन:- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader