Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology: संख्याशास्त्राच्या चार हा अंक बऱ्याच वेळा वेगवेगळे चमत्कार घडवत असतो. चार मूलांक असणारी मंडळी अतिशय मेहनत व अतिश्रम घेऊन आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. सांसारिक सुखापेक्षा आपल्या उद्योगधंद्यात, राजकारणात या व्यक्ती रमलेल्या असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षांमध्ये जी स्थित्यांतरे झाली, शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही सगळी चार अंकाची किमया म्हणता येईल. दोन शत्रू एकत्र येऊन अन्य शत्रूवर कशी मात करतात हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जन्मतारखेवरून लक्षात येते. चार हा अंक कटकारस्थान करून शत्रूवर विजय प्राप्त करत असतो. हा मूलांक असणाऱ्या मंडळींच्या कर्तृत्वात विक्षिप्तपणा आढळला तरी आपल्या बुद्धिचातुर्याने व कटकारस्थानांनी ते राजकीय क्षेत्रात व उद्योगधंद्यात विजय प्राप्त करतात. अशा गोष्टी करताना ते पुढचा मागचा किंवा होणाऱ्या परिणामांचा विचार करत नाहीत.
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचे मूलांक, भाग्यांक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मतारीख ९- २- १९६४ याची फोड करून बेरीज केल्यास शिंदेंचा भाग्यांक ४ असल्याचे लक्षात येते. (९+२+१+९+६+४= ३१, ३+१ = ४)
देवेंद्र फडणवीसांची जन्मतारीख आहे, २२- ७- १९७०. फडणवीसांचा मूलांक म्हणजे फक्त जन्मतारखेची बेरीज ४ च असल्याचे लक्षात येते. (२+२ = ४)
तर अजित पवार यांची जन्मतारीख आहे, २२- ७- १९५९. त्यानुसार त्यांचा ही मूलांक ४ असा येतो.
हे ही वाचा<< “फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी
२०२४ मध्ये शक्ती टिकवण्यासाठी येईल ‘हा’ अडथळा
या तिघांच्याही जन्मतारखांमध्ये चार या अंकाचे साम्य दिसते. आणि याच मूलांक व भाग्यांकाच्या एकीने त्यांनी आपल्या राजकीय शत्रूला तात्पुरते हरवले आहे. दुसरीकडे सध्याचे साल आहे २०२४ ज्याची बेरीज केल्यास एकांक येतो ८. आठ हा मुळात शनीचा अंक मानला जातो तर चार या अंकाचे स्वामित्व राहूकडे आहे. येत्या काळात शनीची शक्ती राहूवर भारी पडून या उर्वरित वर्षात चार अंकाची शक्ती फार काळ टिकू देणार नाही. त्यामुळेच २०२४ मधील राजकीय स्थिती वेगळी असेल.