Akshaya Tritiya 2024 : हिंदू पंचांगनुसार दर वर्षी वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीच्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा १० मे २०२४ रोजी शुक्रवारला अक्षय तृतीया साजरी केली जाणार. अक्षय तृतीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरातील साडे तीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्यतृतीया होय. याला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं त्यामुळे या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाला अक्षय असतं. त्यामुळे या दिवशी अनेक जण आवडीने विवाह करतात, गृहप्रवेश करतात, वस्तु किंवा सोनं खरेदी करतात.

ज्योतिषशास्त्रानुसार या अक्षय तृतीयाच्या दिवशी काही अद्भूत संयोग निर्माण होत आहे ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येईल. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि शुक्र आदित्य योग सारखे काही अद्भूत योगचा समावेश आहे. काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येईल पण या खास दिवशी तीन राशींचे नशीब चमकू शकते.तीन राशींना या दिवशी आर्थिक फायदा होऊ शकतो.आज आपण त्या राशी कोणत्या, या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मेष राशी

अक्षय तृतीयाच्या दिवशी मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअर, व्यवसायात प्रगती होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

हेही वाचा : मे महिना देणार प्रेम, पैसा, प्रसिद्धी… ग्रहयुतीमुळे ‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया फायद्याची ठरेल. या लोकांसाठी अक्षय तृतीया फायद्याची ठरेन. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात वृद्धी होईल. या लोकांना अडकलेली धन संपत्ती परत मिळेल

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी यंदाची अक्षय तृतीया प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देणारी ठरेल. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. यांना धनसंपत्तीचा लाभ मिळू शकतो. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि यांचा अडकलेला पैसा, धन परत मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)