वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती ठराविक काळानंतर बदलते. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक अशुभ किंवा शुभ योग तयार होतात. अशातच आता सूर्य सिंह राशीत प्रवेश करत असल्यामुळे एक अशुभ योग तयार होत आहे. आज १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत चंद्र आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे अमावस्या योग तयार होत आहे. अमावस्या योग हा अशुभ योगांपैकी एक योग मानला जातो. कारण या योगाच्या निर्मितीमुळे चंद्राची स्थिती कमजोर होते. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा आणि सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. अशा स्थितीत चंद्राच्या कमजोरीमुळे काही राशींना मानसिक तणावासोबतच आर्थिक आणि शारीरिक समस्यांना अधिक सामोरे जावे लागू शकते. तर या योगाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया.

वृश्चिक –

या राशीमध्ये सूर्याने दहाव्या स्थानी गोचर केले आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात फायदा होऊ शकतो. पण तुमच्या स्वाभिमानावर थोडं नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे इतरांचा गैरसमज होऊ शकतो. तसेच तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवा, कारण त्याचा तुमच्या व्यावसायिक जीवनावर अधिक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

मकर –

मकर राशीत सूर्य आठव्या स्थानी गोचर करत आहे. त्यामुळे या परिस्थितीत अमावस्या योग या राशीला शुभ सिद्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण काही अनपेक्षित घटनांमुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा- फक्त एक दिवस थांबा, ‘या’ लोकांच्या झोळीत पडेल पैसा? श्रावणातील ‘संक्राती’ला सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतो धनलाभ

कुंभ –

या राशीमध्ये सूर्य सातव्या स्थानी प्रवेश करत आहे. तसेच शनीदेखील या राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत कुंभ राशीच्या लोकांनाही सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या राशीचे लोक रागावर नियंत्रण ठेवून नको असलेले वाद टाळू शकतात. या वादाचा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)