scorecardresearch

१२ वर्षांनी चतुर्ग्रही राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या कुंडलीत प्रचंड धनलाभ? ‘या’ माणसांच्या रूपात लाभू शकते लक्ष्मी कृपा

Astrology News Today: १२ वर्षांनी मेष राशीत सूर्य, बुध, राहू, गुरु हे चार ग्रह एकत्र येणार आहेत. या राजयोगाने प्रचंड लाभ होऊ शकतो. या राशींच्या कुंडलीत धनलाभासह भाग्योदयाचे सुद्धा योग आहेत.

April 2023 Astrology Chaturgrahi Rajyog By Sun Budh Guru Rahu Transit These People will Get Huge Money Investment Lakshmi
१२ वर्षांनी चतुर्ग्रही राजयोग बनल्याने 'या' राशींच्या कुंडलीत प्रचंड धनलाभ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Chaturgrahi Yog In Kundali: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात सर्व मानवी जीवनावर दिसून येऊ शकतो. एप्रिल महिन्यात अनेक ग्रह वक्री होणार आहेत तर काहींचे गोचर होणार आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात गुरुदेवांच्या स्वराशीत म्हणजेच मेष राशीमध्ये चतुर्ग्रही राजयोग तयार होत आहे. १२ वर्षांनी मेष राशीत सूर्य, बुध, राहू, गुरु हे चार ग्रह एकत्र येणार आहेत. या राजयोगाचा प्रभाव १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळेल पण अशा तीन राशी आहेत ज्यांना या राजयोगाने प्रचंड लाभ होऊ शकतो. या राशींच्या कुंडलीत धनलाभासह भाग्योदयाचे सुद्धा योग आहेत. या राशी कोणत्या हे जाणून घेऊया…

चतुर्ग्रही राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या कुंडलीत नवव्या स्थानी चतुर्ग्रही राजयोग तयार होत आहे. हे स्थान भाग्य व प्रवासाचे स्थान मानले जाते. चतुर्ग्रही राजयोगाने आपल्या राशीला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. येत्या काळात तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकते. कौटुंबिक सुखाने तुमचा मानसिक ताण- तणाव दूर होऊ शकतो. तुम्हाला धार्मिक व मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी लाभू शकते. सिंह राशीला जोडीदाराच्या रूपात बक्कळ धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला कार्यस्थळी प्रचंड मान- सन्मान मिळू शकतो.

कर्क रास (Cancer Zodiac)

चतुर्ग्रही राजयोग हा कर्क राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग कर्क राशीच्या कर्म स्थानी तयार होत आहे. येत्या महिन्याभरात कर्क राशीला कार्यसिद्धीचे योग आहेत. व्यवसायिक मंडळींना नव्या कामाच्या संधी लाभू शकतात ज्यातून धनाचे स्रोत वाढू शकतात. हॉटेल व धान्य यांच्याशी संबंधित काम करणाऱ्या मंडळींना प्रगतीचे योग आहेत. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या रूपात लाभ होऊ शकतो पण तुम्ही तुमचा आनंद व लाभ इतरांसह सुद्धा शेअर करायला हवा.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण राजयोग ‘या’ राशींना करणार श्रीमंत? पुढील ३० दिवस बक्कळ धनलाभाने नशिबाला मिळू शकते कलाटणी

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींसाठी चतुर्ग्रही राजयोग नशीब पालटण्याची संधी घेऊन येऊ शकतो. हा राजयोग आपल्या राशीच्या प्राप्ती स्थानी तयार होत आहे. यामुळे तुमच्या आर्थिक बाजूस भक्कम पाठिंबा लाभू शकतो. तुमचे अर्थाजनाचे स्रोत वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तुमचे निर्णय तुमच्या भविष्याला मोठे ट्विस्ट देणारे ठरू शकतात. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. माता लक्ष्मीचा तुमच्यावर कृपाशिर्वाद राहू शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीचा मोठा योग आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 13:06 IST

संबंधित बातम्या