Mercury Retrograde Negative Effects: ग्रहांचा राजकुमार समजला जाणारा बुध आता उलटी चाल (वक्री) सुरू करणार आहे. १८ जुलै रोजी सकाळी १०.१२ वाजता बुध कर्क राशीत वक्री होणार आहे. विशेषतः या काळात काही राशींच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. बुध हा ग्रह बुद्धी, संवाद, गणित, व्यापार व विचारशक्तीचा कारक आहे. जेव्हा बुध वक्री होतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ संप्रेषणावरच नाही, तर आर्थिक, व्यावसायिक व वैयक्तिक जीवनावरही पडतो. यावेळी काही राशींच्या लोकांना फायदा होईल; पण काही राशींसाठी ही वक्री चाल तणाव, अडथळे व अनपेक्षित नुकसान घेऊन येऊ शकते. काही राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच त्यांचे आरोग्य बिघडण्याचीही शक्यता आहे. पण, नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल धोकादायक ठरू शकते ते जाणून घेऊ…

‘या’ राशींच्या लोकांवर कोसळणार वाढत्या समस्या अन् आर्थिक नुकसानीची कुऱ्हाड!

मेष

या राशीच्या लोकांसाठी बुध वक्री होणं अडचणीचं ठरू शकतं. आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्या. अचानक खर्च वाढू शकतो. कामात अडथळे येऊ शकतात. घरातील वाद-विवाद टाळा. विशेषतः मातोश्रींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात अचानक पैशाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ताणतणाव वाढेल. जमिनी, घरखरेदी किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून नुकसान होण्याची शक्यता आहे.

मिथुन

मिथुनसाठी ही काळजी घेण्याची वेळ आहे. घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं. व्यावसायिक निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक निर्णयांत सावधगिरी बाळगा. चुकीच्या निर्णयांमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.  ऑफिसमध्ये मतभेद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांशी संयमाने वागा, नातेसंबंध अधिक नाजूक होऊ शकतात. जुना आजार डोके वर काढून त्रास देऊ शकतो, ज्यामुळे पैशांचा अपव्यय होऊ शकतो.

सिंह

या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना अपेक्षित यश मिळणार नाही. अडकलेले पैसे परत येऊ शकतात, पण एकूणच मानसिक अस्वस्थता वाढेल. जोडीदारासोबत वाद किंवा मनमुटाव टाळा. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित काही समस्या येऊ शकतात, ज्यामुळे मानसिक ताणतणाव राहण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक समस्यांही भेडसावतील. व्यक्तिगत आयुष्यात ताणतणाव वाढू शकतो. या काळात सुरू असलेल्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पात अडथळे येऊ शकतात. धैर्य आणि संयमाने परिस्थिती हाताळा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असूनक ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)