Shani Sade Sati Effects on Zodiac Signs: शनी महाराजांचा कोप कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. पण, एकदा का शनी देवाची नजर एखाद्या राशीवर स्थिरावली की, त्या राशीतील लोकांच्या आयुष्यात अक्षरशः उलथापालथ होते. शनीला न्यायदेवता, असं म्हटलं जातं. त्यामुळे चूक करणाऱ्याला तो कठोर शिक्षा देतो. ज्योतिषशास्त्र सांगतं की, शनीची साडेसाती हा काळ माणसाच्या आयुष्यातील सर्वांत कठीण टप्पा ठरतो.

आता एका राशीच्या लोकांवर शनीची दुसरी साडेसाती कोसळणार आहे. हा टप्पा सर्वांत त्रासदायक मानला जातो. पुढील अडीच वर्षं त्या राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक गुंतवणूक, कौटुंबिक जीवन, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांत खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागू शकतो.

शनीच्या साडेसातीमुळे कोणत्या अडचणींचा फेरा?

  • नोकरी-व्यवसायात अडथळे : केलेल्या परिश्रमाला अपेक्षित फळ न मिळणं आणि या काळात नोकरीतील अडचणी, व्यापारातील नुकसान, कर्जबाजारीपणा, अचानक मोठं नुकसान होणं किंवा बढती/वाढ थांबणं अशा घटना घडू शकतात.
  • कौटुंबिक कलह : कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. विशेषतः वडिलांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद वाढणं, नातेसंबंधांमध्ये कटुता येणं यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • आर्थिक तोटा : चुकीच्या गुंतवणुकीमुळे मोठं नुकसान, पैशांची कमतरता उद्भवण्यासह मोठं आर्थिक नुकसान या काळात होऊ शकतं. खर्च अचानक वाढेल आणि अनावश्यक आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो.
  • आरोग्य धोक्यात : वारंवार आजारपण, अपघात, शारीरिक-मानसिक त्रास. अशा प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

ज्योतिषतज्ज्ञ सांगतात की, या काळात व्यक्तीनं संयम, नियोजन आणि सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. नियम पाळले पाहिजेत, संयम ठेवला पाहिजे आणि धार्मिक कार्यात सहभाग वाढवला पाहिजे, तर शनीचा कोप काही प्रमाणात शांत होऊ शकतो.

अडीच वर्ष कोणत्या राशीवर असणार शनीची साडेसाती?

आता प्रश्न असा आहे की, पुढील अडीच वर्ष हे संकट नक्की कोणत्या राशीवर कोसळणार? तर ३० वर्षांनी शनीनं पुन्हा मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना शनीच्या दुसऱ्या साडेसातीच्या फेऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. या राशीतील लोकांनी पुढील अडीच वर्षं विशेष खबरदारी घ्यावी; अन्यथ शनी महाराज त्यांना शिक्षा देऊ शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)