Bhadra Rajyog 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात पंच महापुरुष योगांपैकी एक अतिशय शुभ योग म्हणजेच भद्र योग मानला जातो. हा योग बुध ग्रहाच्या गोचरावर तयार होतो आणि जेव्हा हा योग निर्माण होतो तेव्हा काही राशींच्या लोकांचं नशीब अक्षरशः पालटते. हातात चांगला पैसा, समाजात मान-सन्मान, बुद्धीला धार आणि बोलण्यात गोडवा, असा अद्भुत परिणाम या योगामुळे साधला जातो. या वेळी बुध ग्रह कन्या राशीत आपल्या उच्च स्थितीत विराजमान आहे आणि त्यामुळे भद्र राजयोगाची निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे २१ सप्टेंबर २०२५ ला कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे आणि या योगाचा काही राशींवर प्रचंड प्रभाव पडणार आहे. ज्योतिषांच्या मते, हा योग खास करून तीन राशींच्या लोकांना प्रचंड लाभ देणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी? पाहूया सविस्तर…
५ दिवसांनी होणार भाग्याचा खेळ; भद्र राजयोग देणार अनपेक्षित लाभ
मिथुन – पैसा आणि मान दोन्ही मिळणार
हा योग मिथुन राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी घेऊन आलाय. या काळात तुमचे उत्पन्न झपाट्याने वाढू शकते. समाजात ओळख आणि मान-सन्मान मिळेल. पत्रकारिता, मीडिया, लेखन, राजकारण किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनखरेदीचा योग आहे. बुद्धिमत्ता आणि सामाजिक यश तुमचं भाग्य उंचावतील.
कन्या – आयुष्यात मिळेल यश
हा योग कन्या राशीवाल्यांसाठी अगदी खास आहे. कारण- बुध स्वतःच्या उच्च राशीत आहे. करिअर, भागीदारी व व्यक्तिमत्त्वात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना उत्तम फळं मिळू शकतात. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांनादेखील या काळात चांगला नफा मिळू शकतो. आयुष्याच्या अनेक क्षेत्रांत भाग्य साथ देऊ शकते.
धनू – करिअरमध्ये मोठी उन्नती
हा योग धनू राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवी दारे उघडू शकेल. जबाबदाऱ्या वाढतील, प्रमोशनचे संकेत आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. स्पर्धेत विजय मिळवता येईल. प्रोफेशनल ग्रोथ आणि करिअरमध्ये झपाट्याने उंची गाठण्याची संधी मिळू शकेल.
ज्योतिषी सांगतात की, सूर्यग्रहणाआधी कन्या राशीत तयार झालेला भद्र राजयोग म्हणजे नशिबाचं दार उघडणारं संधीचं दार आहे. या तीन राशींच्या लोकांसाठी येणारा काळ सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा ठरू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)