scorecardresearch

Premium

Shukra Grah Gochar: २७ फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं मकर राशीच गोचर, ‘या’ राशींच्या अडचणी वाढणार

वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे.

shukrgrah-6
Shukra Grah Gochar: २७ फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं मकर राशीच गोचर, 'या' राशींच्या अडचणी वाढणार

वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे. ज्योतिषांच्या मते, जर कुंडलीत शुक्र ग्रह शुभ स्थितीत नसेल तर व्यक्तीच्या जीवनातील शुभ कार्य तितकी होत नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह शुभ आणि चांगल्या स्थितीत असतो, अशा लोकांचा स्वभाव आकर्षक असतो आणि स्वभावाने खूप रोमँटिक असतात. याशिवाय अशा लोकांचे प्रेम आणि वैवाहिक जीवन खूप यशस्वी आणि आनंदी असते. कोणत्याही ग्रहाने राशी बदलली तरी त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. ज्योतिषीय गणनेनुसार, शुक्र २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. यासोबतच या मार्गक्रमणाचा परिणाम देशव्यापी आणि जागतिक स्तरावर दिसणार आहे.

शुक्र ग्रह गोचर: २७ फेब्रुवारी २०२२ रोजी शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करत आहेत. नाती आणि सकारात्मक बदलांचा साक्षीदार होऊ शकतो. मकर राशीवर शनीचे अधिपत्य असल्याने आणि शुक्र मकर राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींना फायदा होईल. नोकरीच्या संदर्भात परदेश प्रवास, पदोन्नती इत्यादीचीही दाट शक्यता आहे. याशिवाय वस्त्रोद्योगात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच चांदी आणि हिऱ्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

nirmala sitaraman halwa ceremony
Union Budget 2024 : हलवा समारंभ संपन्न, दरवर्षी का साजरी केली जाते ही परंपरा?
Mars and Mercury will come close
मंगळ आणि बुध ग्रह जवळ येणार, पूर्व क्षितीजावर अपूर्व अनुभूती; वाचा अनोख्या दृष्याचा आनंद केव्हा घेता येणार?
ayodhya ram mandir inauguration ram mandir pran pratishtha in ayodhya
नव्या कालचक्राची सुरुवात; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; अयोध्येत रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
sun planet made kendriya effect these zodiac sign get more profit
५० वर्षांनंतर सूर्याने निर्माण केला केंद्रीय प्रभाव, ‘या’ राशींसाठी सुरू होईल सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसह मिळेल भरपूर पैसा

कर्क: कर्क राशीच्या लोकांना या संक्रमण काळात अधिक काळजी घ्यावी लागेल. नातेसंबंधातील मतभेदांसह, चुकीचे मित्र निवडल्याने त्रास होऊ शकतो. या दरम्यान कोणताही लांबचा प्रवास टाळा, तसेच कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. तब्येतीची काळजी घ्या.

सिंह: शुक्र राशीच्या बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना नोकरी, आर्थिक जीवन आणि आरोग्याच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील असे दिसत नाही. नोकरीत अचानक बदल होऊ शकतो. यासोबतच प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येण्याची शक्यता आहे. खर्च वाढणार आहेत, तब्येतीची काळजी घ्या. नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो.

Shani Uday 2022: कर्मदाता शनिदेवांचा होणार उदय, सहा राशींना मिळणार नशिबाची साथ

वृश्चिक: या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच, नातेसंबंधात अडचण येण्याची शक्यता आहे, म्हणून वैयक्तिक जीवनात जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. मित्र आणि व्यावसायिक सहकाऱ्यांकडून तुमच्या आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Astrology 0 shukra grah gochar in makar rashi rmt 84

First published on: 24-02-2022 at 15:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×