धार्मिक मान्यतेनुसार शनिवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो. या दिवशी विधीपूर्वक हनुमानजींची पूजा करून व्रत केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानण्यात येते. यासोबतच संकटांपासून मुक्ती मिळण्याची श्रद्धा आहे. मान्यतेनुसार हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात. हनुमानजींची नियमित पूजा केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि सकारात्मक परिणामही मिळतात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार अशा अनेक राशी आहेत ज्यावर हनुमानाची कृपा कायम राहते.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांवर हनुमानजींची विशेष कृपा राहते. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना नेहमी हनुमानजींचा आधार मिळतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्यासोबतच आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता असते.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना हनुमानजींची साथ मिळते. या राशीच्या लोकांना नेहमी हनुमानजींचा आधार मिळतो. शनिवारी विधिवत हनुमानाची पूजा केल्याने आर्थिक उन्नती होते. त्याचबरोबर घरात शांततेचे वातावरण राहते.

( हे ही वाचा: १ जानेवारी पासून ‘या’ ४ राशी होणार श्रीमंत? शनिदेव वर्षभर मिळवून देणार प्रचंड धनलाभाची संधी)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह राशी

ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीला हनुमानाची आवडती राशी मानली जाते. या राशीच्या लोकांवर बजरंगबलीची विशेष कृपा असते. या राशीचे लोक कोणतेही काम यशस्वी करतात. हनुमानजींच्या कृपेने यश नक्कीच मिळते. हनुमान जी या लोकांचे सर्व संकट दूर करतात असे मानण्यात येते.