Baba Vanga August Predictions: बाबा वेंगा यांनी २०२५ च्या ऑगस्ट महिन्यासाठी दोन मोठी भाकितं केली होती, जी आता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहेत. बाबा वेंगांचं भाकीत सोशल मीडियावर खूप चर्चेत असतं, कारण त्यांची अनेक भाकितं खरी ठरल्याचं दिसून आलं आहे. या प्रसिद्ध बल्गेरियन महिलेचं १९९६ साली निधन झालं, त्यांना बाल्कन भागातील ‘नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणतात.
मृत्यूपूर्वी त्यांनी पुढील अनेक वर्षांबद्दल बरीच माहिती सांगितली होती- भविष्यात नेमकं काय होणार आहे, याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. आता २०२५ च्या ऑगस्टबद्दल केलेल्या त्यांच्या दोन भविष्यवाण्या खूप चर्चेत आहेत. चला तर मग पाहूया, त्यांनी ऑगस्टबद्दल काय भाकीत केलं होतं.
साल २०२५ च्या ऑगस्ट महिन्यासाठी बाबा वेंगांनी दोन भविष्यवाण्या केल्या आहेत. या भाकितांमध्ये त्यांनी “डबल फायर” म्हणजेच दुहेरी आगीचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलं की ऑगस्टमध्ये आकाशातून आणि जमिनीतून आग निघेल. काही लोकांना वाटतं की ही आग जंगलातील आगीसारखी असू शकते, तर काहींचं मत आहे की हे ज्वालामुखीचा स्फोट असू शकतो. काही लोक असंही म्हणतात की, एखादा लहान ग्रह (क्षुद्रग्रह) पृथ्वीवर आदळण्याचा धोका असू शकतो.
घडू लागतील आश्चर्यकारक घटना
त्याचबरोबर बाबा वेंगांनी अजून एक भविष्यवाणी केली आहे की ऑगस्टपर्यंत मानवजातीला एखाद्या ज्ञान किंवा बुद्धीच्या जवळ पोहोचता येईल, ज्यामुळे आणखी आश्चर्यकारक घटना घडू लागतील. बाबा वेंगांच्या या भविष्यवाण्यांची सामान्य लोक वाट पाहत आहेत आणि पाहत आहेत की पुढे काय होणार. त्यांनी इशारा देताना असंही सांगितलं की जे एकदा उघडेल, ते पुन्हा कधीच बंद होणार नाही. लोकांचा अंदाज आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शी संबंधित असू शकतं.
नाटो संघटनेत फूट पडण्याचे संकेत
बाबा वेंगांची पुढची चेतावणी अशी आहे की एलियन्स (परग्रहवासी) आणि माणसं भेटतील. त्यानंतर ते एकमेकांकडे किंवा आपल्या-आपल्या भागात परत जातील. नाटो किंवा युरोपियन युनियनचे सदस्य देश ही जबाबदारी उचलतील. यामुळे पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यांच्यात चिंता किंवा अविश्वास वाढेल आणि हा युनियन कायमचा तुटू शकतो. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की २०२५ साली एक नैसर्गिक आपत्ती येणार आहे.