Baba Vanga Prediction For 2025: जगप्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा यांनी २०२५ या वर्षाच्या संदर्भात हादरवून टाकणाऱ्या अनेक भविष्यवाणी सांगितल्या आहेत. ज्या खऱ्याही ठरतायत. सध्या बऱ्याच दुर्घटना घडत असताना सोशल मीडियावर एक नाव चर्चेत असते ते म्हणजे बाबा वेंगा, बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. २०२५ मध्ये सुद्धा त्यांनी जगात नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक मोठ्या संकटाच्या घडामोडी घडतील असे भाकीत केले होते. जग युद्धाच्या दिशेने वळणार असल्याची भविष्यवाणी इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्धाच्या रूपात तर निसर्गाचा कोप होण्याचे भाकीत हे ठिकठिकाणी आलेल्या पूर व भूकंपाच्या घटनांनी खरे झाले असल्याचेच म्हणावे लागेल. अशातच येत्या ५ जुलै रोजी पुन्हा एकदा त्सुनामी येणार असल्याचा इशारा ‘नवीन बाबा वेंगा’ यांनी दिला आहे.

‘नवीन बाबा वेंगा’

जपान आणि फिलीपिन्स यांच्यामधील समुद्राच्या तळाशी एक मोठी भेग पडेल, आणि यापूर्वी आलेल्या त्सुनामीच्या तिप्पट मोठ्या लाटा तटांवर आदळतील, अशी ही भविष्यवाणी आहे. जपानी मंगा कलाकार रयो तात्सुकी यांनी ‘द फ्युचर आय सॉ’ या पुस्तकात ५ जुलै रोजी मोठी त्सुनामी येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्यांना जगभरात ‘न्यू बाबा वेंगा’ म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनीही खऱ्या बाबा वेंगांप्रमाणेच अनेक भविष्यवाण्या केल्या असून, त्यापैकी अनेक नंतर खरी ठरल्याचं मानलं जातं.

रयो तात्सुकी कोण आहे?

रयो तात्सुकी स्वप्नांवर आधारित भविष्यवाण्यांमध्ये कला मिसळण्यासाठी ओळखली जाते. भूतकाळात तिने अनेक प्रमुख घटनांचे भाकीत केले होते.

  • मार्च २०११ चा तोहोकू भूकंप आणि त्सुनामी
  • राजकुमारी डायनाचा मृत्यू
  • फ्रेडी मर्क्युरीचे निधन
  • कोविड-१९ महामारी

तिने असा दावाही केला आहे की २०३० मध्ये कोविडचा एक नवीन, अधिक घातक प्रकार परत येईल. तिच्या मंगा पुस्तकांनी गेल्या काही वर्षांत एक भीती निर्माण केली आहे, परंतु ५ जुलै २०२५ ची भविष्यवाणी अचानक व्हायरल झाली आहे. “जपानमध्ये एक मोठी आपत्ती येईल” ही विशिष्ट चेतावणी, विशेषतः पर्यटकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे.

पर्यटनांना मोठा फटका

या भविष्यवाणीचा जपानच्या अर्थव्यवस्थेवर आधीच परिणाम होत आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजेंसच्या अहवालानुसार, जुलैच्या सुरुवातीला हाँगकाँगमधून होणाऱ्या फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगमध्ये जवळपास ५०% घट झाली आहे.

काही प्रकरणांमध्ये, चीन, थायलंड आणि व्हिएतनाममधून होणाऱ्या प्रवास बुकिंगमध्ये ८३% इतकी घट झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या तारखेला जपानमध्ये असण्याची भीती असल्याने अनेकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत.जपानच्या पर्यटन उद्योगासाठी हा एक नवीन धक्का आहे