Baba Vanga 2025 Predictions: जगभरात आपल्या अचूक भाकितांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांचे नाव आजही रहस्यमयतेनं वेढलेलं आहे. १९८९ मध्ये बर्लिन भिंत कोसळण्यापासून ते करोना महामारीपर्यंत त्यांनी केलेली अनेक भाकितं काळाच्या कसोटीवर खरी उतरल्याचं सांगितलं जातं. आता त्यांच्या आणखी एका भविष्यवाणीकडे पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

भविष्यवेत्त्या वेंगा यांनी वर्ष २०२५ च्या शेवटच्या दोन महिन्यांसाठी म्हणजे नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ यासाठी केलेलं एक विशेष भाकीत आज चर्चेत आहे. त्यांच्या मते, या काळात चार राशींच्या लोकांच्या जीवनात जबरदस्त बदल होऊ शकतात. काही राशींच्या लोकांसाठी हा काळ सोन्याचा काळ ठरू शकतो आणि २०२६ पर्यंत त्यांना धन, मान, यश व कीर्तीचा वर्षाव होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. चला जाणून घेऊया त्या चार भाग्यवान राशींचे लोक कोण आहेत आणि त्यांचं भविष्य काय सांगतं…

शेवटचे दोन महिने ठरतील भाग्यवान! या राशींचं नशीब एका झटक्यात बदलेल का?

मेष (Aries): करिअरमध्ये झेप, संपत्तीत वाढ

भविष्यवाणीप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत मेष राशीच्या व्यक्तींचं नशीब खुलू शकतं. नव्या संधींचे दरवाजे उघडतील आणि आधी केलेल्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. काहींसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याचे योग दिसत आहेत. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि कौटुंबिक वातावरणही सौहार्दपूर्ण राहील. काहींना मित्रांच्या मदतीने मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. २०२६ पर्यंत या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये वाढ व प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

कर्क (Cancer): भाग्याची साथ आणि नात्यांमध्ये सुधारणा

नोव्हेंबर–डिसेंबरचा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी भावनिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर सकारात्मक राहू शकतो. त्यामुळे कुटुंबातील मतभेद मिटतील, जुने गैरसमज दूर होऊ शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि काही जणांना प्रवासाची संधी मिळू शकते. काही ज्योतिषांच्या मते, या काळात कर्क राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा लॉटरीसारखा फायदा होऊ शकतो. तुम्ही वर्षाच्या अखेरीस प्रिय व्यक्तींसोबत सणासुदीचा आनंद साजरा करण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo): इच्छापूर्तीचा काळ आणि सन्मानात वाढ

हा काळ कन्या राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. नवीन घर किंवा वाहनखरेदीचा योग संभवतो. कुटुंबातील सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते आणि पदोन्नतीची शक्यता आहे. या काळात सामाजिक प्रतिष्ठा आणि मान वाढण्याची शक्यता आहे. २०२६ पर्यंत धन आणि यशाची सतत वाढ दिसू शकते. नवीन कार या काळात खरेदी करु शकता.

मकर (Capricorn): लॉटरीचा योग आणि विदेशप्रवासाची शक्यता

बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार मकर राशीच्या लोकांना या काळात संपत्तीविषयक लाभ संभवतो. काहींना जुने मालमत्तेचे वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. काही व्यक्तींना २०२६ मध्ये विदेशप्रवासाची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्येही स्थैर्य येण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक पाठबळ लाभेल. २०२६ पर्यंत स्वप्नातील घर मिळू शकतं.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)