Daily Horoscope In Marathi 7 september 2025 : आज ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. पौर्णिमा तिथी सकाळी १ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी संपेल. आज सुकर्मा योग जुळून येईल आणि शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. २०२५ मध्ये भाद्रपद पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. कारण – या दिवशी चंद्रग्रहण देखील होणार आहे. हा दिवस भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजेसाठी समर्पित आहे. तर आज कोणत्या राशीचा दिवस कसा जाणार जाणून घेऊया…

७ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi 7 september 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

बोलण्यात माधुर्य ठेवा. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तु सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. मानसिक गोंधळ टाळावा. जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मन विचलीत होऊ देऊ नका. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल. बचतीच्या योजना आखाल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल. व्यावसायिक कामात बदल जाणवेल. अभ्यासाचा कंटाळा करू नका. कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

अचानक धनलाभाची शक्यता. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. भागीदारीत सतर्क राहावे.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारी वर्गासाठी सामान्य दिवस.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर