Buddha Purnima 2025: वैशाख महिन्यात पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी खूप खास असतो. असं म्हणतात या दिवशी बुद्धांना एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाला बोधीवृक्ष असं संबोधलं जातं. हिंदू पंचागनुसार, या वर्षी बुद्ध पौर्णिमा १२ मे २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या वेळी बुद्ध पौर्णिमा अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी वरियान योग आणि रवि योग दोन्ही निर्माण होत आहे, ज्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते. य दोन शुभ योगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. काही राशींवर याचा विशेष प्रभाव दिसून येतो. जाणून घेऊ या, त्या लकी राशी कोणत्या आहेत.
वृषभ राशी (Taurus Zodiac)
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाची सुरुवात होईल. विशेष करून या लोकांना आर्थिक प्रकरणात सुधारणा दिसून येईल. जर हे लोक कोणत्याही प्रकारे आर्थिक समस्यांचा सामना करत असेल तर या लोकांची त्यातून सुटका होऊ शकते.
मानसिक स्वरुपात हे लोक आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटेन. या वेळी आपल्या करिअरशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. दांपत्य जीवनात चांगले बदल होऊ शकतात. नात्यामध्ये सुधारणा दिसून येईल. नात्यामध्ये गोडवा दिसून येईल. या लोकांना जोडीदाराचे सहकार्य मिळेन.
कर्क राशी (Cancer Zodiac)
बुद्ध पौर्णिमा कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ संदेश देणारी ठरेन. या दरम्यान या लोकांचे नशीब चमकू शकते. घरात सुख सुविधांमध्ये वृद्धी होईल. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेन. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.
या लोकांची कामात एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात वृद्धी दिसून येईल . या लोकांना आर्थिक सुधारणा दिसून येईल. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद नांदेल. या राशीच्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. या लोकांना मानसिक शांती अनुभवता येईल. कार्यक्षेत्रामध्ये सन्मान मिळेल. काही लोकांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो.
धनु राशी (Sagittarius Zodiac)
बुद्ध पौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मकता घेऊन येईल. या राशीच्या लोकांना या वेळी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. या लोकांना करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. ऑफिसमध्ये या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. उच्च अधिकारी या लोकांच्या कामाने प्रभावित होईल.
या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत दिसून येईल. या लोकांना धन संपत्तीच्या प्रकरणात समाधान लाभेल तसेच जोडीदाराबरोबरचे नाते आणखी दृढ होईल. सामाजिक स्वरुपात प्रतिष्ठा वाढणार. काही लोकांना मोठ्या प्रवासाच्या संधी मिळू शकतात. जो पुढे जाऊन लाभदायक ठरू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)