Navpancham Rajyog Lucky Zodiac Sign: वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांच्या हालचाली मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. कधी कधी त्यांच्या विशेष योगामुळे काही राशींचं नशीब चमकू लागतं. असाच एक अत्यंत शक्तिशाली योग म्हणजे ‘नवपंचम राजयोग’, जो २८ जून २०२५ रोजी तयार होतोय. या दिवशी शनि आणि बुध ग्रह १२० अंशांच्या अंतरावर येऊन राजयोगाची निर्मिती करतील. या योगाचा प्रभाव काही राशींवर विशेष शुभ ठरणार असून, नवीन नोकरी, प्रमोशन, धनलाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे नशीब क्षणात पालटणार!

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरु शकतो. या काळात वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते तर व्यवसायात नवीन करार आणि नफा मिळू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि अचानक धनलाभ होण्याची संधी निर्माण होईल. दुसरीकडे, व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांमुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. नवीन स्टार्टअप किंवा योजना सुरू करायची असेल तर ही उत्तम वेळ ठरु शकते. नोकरदार मंडळींना नव्या नोकरीची संधी लाभू शकते. घरात सुख-शांती नांदून जोडीदाराबरोबर चांगले क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.

तूळ (Libra)

तूळ राशीसाठी राजयोग मान-सन्मान आणि लोकप्रियता वाढवणारा ठरु शकतो. विदेश प्रवासाची संधी मिळू शकते, तसेच परदेशातील नोकरीसाठी अर्ज यशस्वी होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शुभ बातम्या, आर्थिक सुधारणा आणि मनातील योजना पूर्ण होण्याचा हा काळ ठरु शकतो. पैसा आणि करिअरच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. राजकारण, सामाजिक कार्यात या राशीची मंडळी आपले वर्चस्व कायम राखू शकतील.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अडकलेले प्रोजेक्ट्स मार्गी लागतील. या राजयोगामुळे तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि सामाजिक सन्मान प्राप्त होऊ शकतो. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतणार आहात, त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. तुम्हाला शेअर बाजारातून काही अंशी लाभ होण्याची चिन्हे आहेत. अनेक इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक सुखाने तुमचे येणारे दिवस समृद्ध होऊ शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)