ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि संपत्तीचा कारक आहे. जर कुंडलीत बुध बलवान असेल तर तो माणूस खूप हुशार आणि बोलण्यात पारंगत असल्यामुळे व्यापारी बनू शकतो. तर कमकुवत बुधमुळे बोलण्यात समस्या निर्माण होऊ शकते. येत्या ७ जून रोजी बुधचे गोचर होणार आहे. बुध राशी परिवर्तन करुन वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध ७ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीतील बुध प्रवेश मेष, मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांना त्रासदायक ठरु शकतो. तर बुध गोचरमुळे ४ राशींचा लोकांना चांगला लाभ होण्याती शक्यता आहे. बुध गोचर कोणत्या राशींसाठी शुभ ठरु शकते ते जाणून घेऊया.

वृषभ –

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

बुध गोचर करुन वृषभ राशीत प्रवेश करताच या राशीच्या लोकांना मोठा लाभ देऊ शकतो. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते. इच्छित पदोन्नती आणि पगारात वाढ यामुळे तुमचे मन प्रसन्न होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने आर्थिक समस्या संपू शकतात.

कर्क –

हेही वाचा- सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश घेत ‘या’ ५ राशींच्या भाग्याला देईल झळाळी? ‘या’ रूपात लक्ष्मी बनवू शकते लखपती

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध गोचर खूप शुभ ठरु शकते. या लोकांना पैसे मिळू शकतात तसेच नोकरीत प्रगती होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात देखील यश मिळू शकते. या काळात एखादा मोठा व्यवहार होऊ शकतो. गुंतवणूक करू शकता. बचत करण्यासाठी देखील ही वेळ चांगली ठरु शकते.

वृश्चिक –

बुध ग्रहाचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक दोन्ही फायदे देऊ शकते. वाणीच्या बळावर काम कराल, कामात यश मिळू शकते. या काळात उत्पन्नातही वाढू होऊ शकते. नम्रपणे बोललात तर अवघड कामेही सोपी होऊ शकतात.

धनु –

बुध राशीचे परिवर्तन धनु राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ देऊ शकते. नोकरीत अपेक्षित प्रगती होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात काहीतरी चांगले होईल ज्याचा तुम्हाला भविष्यातही लाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)